शिंदेंचं बंड खरोखरच ‘महाग’ ठरतंय ? | 3000 कोटींचा ‘भाव’ खातंय ?

0
1280

मुंबई :

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता गेले चार दिवस राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. आधी सूर मग गुवाहाटीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत असलेल्या बंडखोरांवर होत असलेल्या खर्चांच्या निरनिराळ्या आकड्यांची चर्चा होते आहे. कसे 65 लाख रुपये खर्च करुन सात दिवस या हॉटेलातील रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. लाखो रुपयांची उधळण कशी चॉपर्ससाठी करण्यात येते आहे. आसाम आणि गुजरात सरकारची सुरक्षा व्यवस्था कशी या बंडखोर आमदारांच्या दिमतीला आहे, अशा निरनिराळ्या चर्चा रोज झडत आहेत. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून बंडखोरी केलेल्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच अनेक माध्यमातही हा आकडा रंगवून सांगितला जातोय.

कसा येतोय ३ हजार कोटींचा आकडा

सध्या 50 हून अधिक आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यात शिवसेनेचे 40 हून अधिक तर 10 एक अपक्ष, शिवसेना सहयोगी आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये असा हिशोब धरला, तर गुवाहाटीत उपस्थित असलेल्या आमदारांचा आकडा हा 50 आहे. म्हणजे ही बेरीज साधारणपणे 2500 कोटींपर्यंत जाते आहे. तसेच फाईव्ह स्टार हॉटेल्स, दररोजचा जेवणखाण्याचा खर्च, वाहतूक व्यवस्था, या बंडखोरीच्या नाट्यात होत असलेला चॉपर्स आणि विमानांचा वापर त्यातून हा सगळा तीन हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.