कातकरी समाजातील शिल्पाचा नगराध्यक्षांकडून सत्कार….!

0
331

कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा शांताराम पवार हिने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शिल्पा हिचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कणकवली गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा ही दहावी उत्तीर्ण झालेली पहिलीच विद्यार्थिनी आहे. या उज्ज्वल यशाबद्दल नगराध्यक्ष नलावडे यांनी कणकवली नगरपंचायतच्या वतीने शिल्पा हिचे अभिनंदन केले. शिल्पा हिला पुढील शिक्षणासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण करणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. यावेळी कातकरी अखंड लोकमंच चे अध्यक्ष नामानंद मोडक, शांताराम पवार , राजू गवाणकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.