फटाके लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

0
840
  1. कणकवली : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घडामोडींचे पडसाद कणकवली तालुक्यात उमटत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत हे गुहाटीला जात शिंदे गटात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाच्या समोर फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला. म्हणून कणकवलीतील पाच ते सहा भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीमध्ये पोलिसांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या संदर्भात कणकवली मध्ये फटाके वाजवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या नोटिसा पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.