भोसले पॉलिटेक्निकमध्ये 29 जूनला वेध भविष्याचा…!

0
150

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये बुधवार, २९ जून रोजी सकाळी १० वा. दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी *‘वेध भविष्याचा, तंत्रशिक्षण निवडण्याचा ’* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, अभ्यासक्रमाचे स्वरूप तसेच प्रवेश प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षात कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही याप्रसंगी केला जाणार आहे.

सध्या औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरूप बदललेले असून त्यादृष्टीने आवश्यक ते बदल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये केले आहे. यामध्ये प्रात्यक्षिक ज्ञानावर जास्त भर दिला असून विविध मायक्रो प्रोजेक्ट्सच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला जातो. यासंबंधीची सखोल माहिती यावेळी दिली जाणार आहे. कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. सावंतवाडी बस स्थानक ते कॉलेजपर्यंत ये-जा करण्यासाठी स्कूलबस सुविधाही यावेळी उपलब्ध असणार आहे. नावनोंदणीसाठी ०२३६३-२७३५३५/२७३४५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.