केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी 2.50 रुपये दर कमी केल्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल चे दर 5 रुपयांनी कमी झालेत

0
637
नवी दिल्ली:  केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात केल्यानंतर, आता फडणवीस सरकारनेही कर कपात केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक्साईज ड्युटी कमी करत पेट्रोल-डिझेल दीड रुपयांनी स्वस्त केलं. शिवाय तेल कंपन्यांनीही 1 रुपये दरकपात करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे पेट्रोल-डिझेल अडीच रुपये स्वस्त झालं. मग राज्य सरकारांनीही करांमध्ये कपात करावी असं आवाहन अरुण जेटली यांनी केलं होतं. जेटलींच्या या आवाहनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले, शिवाय महाराष्ट्र सरकारही अडीच रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्राचे अडीच आणि राज्याचे अडीच रुपयांची कपात केल्याने पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.