अनिल सरमळकर बिग बी अमिताभ यांना करणार दिग्दर्शन | कोकणातील ठरणार पहिले चित्रपट दिग्दर्शक

0
647

मुंबई :

सिंधुदुर्गातील आघाडीचे तरूण ‘ द फॉक्स ‘ फेम कवी लेखक नाटककार दिग्दर्शक अनिल सरमळकर यांनी आता चित्रपट क्षेत्रातही प्रवेश केला असुन त्यांनी लिहिलेला दिग्दर्शित आणि निर्मिती केलेला कोकणातील पहिला मराठी चित्रपट ‘ काहूर ‘ अनेक अडचणींवर मात करुन आगामी काळात तो प्रदर्शनासाठी तयार होत असतांना अनिल सरमळकर आणि कोकणातील चित्रपट क्षेत्राला एक सुखद धक्का मिळत आहे तो म्हणजे अनिल सरमळकर लिखित दिग्दर्शित आगामी नियोजित महत्वाकांक्षी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांनी भूमिका लिहिली होती ती भूमिका करण्यास बिग बी यांचा होकार मिळत असल्याचे खात्रीलायक वृत्त सनी बॅंकर या चित्रपटाचे सहनिर्माते आणि प्रोडक्शन मॅनेजमेन्ट संभाळणार्या ‘ फिलिपाईन्स फिल्म प्रोडक्शन्सच्या वतीने देण्यात आले आहे.

खुद्द बिग बी यांचा होकार मिळाल्यानंतर आपणाला कधी नव्हे इतका आनंद झाल्याचे सनी बॅंकर ‘ लेखक दिग्दर्शक अनिल सरमळकर यांनी सांगितले ते म्हणाले गेली विस वर्षे मी अहोरात्र जो कलेचा साहित्याचा ध्यास घेतला होता त्याचे कुठेतरी आज सार्थक होत आहे असे मला वाटते. महानायक अमिताभ यांचा होकार मिळणे या भूमिकेसाठी हा माझा माझ्या लेखनाचा गौरव आहे असे मी समजतो कारण अमिताभ म्हणजे कलेचा हिमालय आहेत आणि मी तर चित्रपट क्षेत्रात कलेत एक लहानसे मुल आहे अद्याप, मात्र ही भूमिका मी त्यांच्यासाठीच लिहिली होती पण मी ते केवळ एक स्वप्न पाहत होतो की एवढा महान नटरंग ही भूमिका करेल का ? पण आज त्यांच्या होकारानेही मला प्रचंड मोठे बळ दिले आहे आणि त्याचवेळी मी गंभीरही झालो आहे कारण हे शिवधनुष्य आहे. मात्र एवढे नक्की की मी इंडस्ट्रीमधील अत्यंत प्रोफेशनल आणि तगडी टीम घेवूनच उतरणार आहे. दरम्यान माझे टीम बांधण्याचे काम आधीच सुरु झाले आहे
असे अनिल सरमळकर यांनी सांगितले.

सनी बॅंकर ही अनिल यांची पहीली हिंदी फिल्म असेल तसेच ती इंग्रजीतुनही जगभरातील फिल्म फेस्टिव्हल्समधुन दाखविली जाणार आहे तथापि महानायक अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शन करणारे अनिल सरमळकर हे कोकणातील पहिले लेखक दिग्दर्शक असणार आहेत. तसेच या चित्रपटात ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी अभिनेते मकरंद देशपांडे रणदीप हुडा  सौमित्र किशोर कदम आदी कलाकार भूमिका करतील तर अभिनेत्री आणि इतर अनेक कॅरक्टर्ससाठी कास्टिंग प्रकिया मुंबईत सुरु होणार आहे.

सनी बॅंकर ‘ ही एक ब्लॅक कॉमेडी असुन कथेमधे मॅजिक रिॲलिजम आणि व्हीएफएक्सचाही महत्वपूर्ण वापर करण्यात येणार आहे तेवढीच ही कथा अनेक वळणे घेत अत्यंत गंभीर असे सामाजिक भाष्य करणारी आहे. यामधील बिग बी यांची भूमिका महत्वाची असुन त्या भुमिकेबद्दल उत्सुकता आहे. फिलिपाईन्स फिल्म प्रोडक्शन्स हे या चित्रपटाचे एक मुख्य निर्मिती  प्रेरक असुन इतर काही प्रोडक्शन्स संस्था सहभागी होणार आहेत.

गेली दोन दशके सामाजिक चळवळ मराठी इंग्रजीतुन कवीता कादंबरी समीक्षा वैचारिक लेखन नाट्यलेखन दिग्दर्शन करत आता डॉ. अनिल सरमळकर यांनी कोकणात राहूनही चित्रपट क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे आणि एवढेच नव्हे तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करण्याचे कलात्मक धैर्य दाखवित ते मुख्य प्रवाहात प्रवेश करत असल्याने त्यांचे खासकरून कोकणातून स्वागत होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.