मयुरेश जाधवने राजस्तरीय स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

0
266

कुडाळ :

सावंतवाडी – सालइवाडा येथील मयुरेश मंगेश जाधव याने सातारा येथे झालेल्या कुराश क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली असून ५० किलो वजनी गटात तो सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मयुरेश हा सिंधुदूर्ग जिल्हा ज्युडो कराटे आकिदो असोशिएशन ( सावंतवाडी ) या संस्थेकडे गेली सात वर्षे कराटे चे धडे घेत आहे. या कराटे स्पर्धेमध्ये त्याने जिल्ह्यात तीन सुवर्ण पदक पटकावली आहेत. राज्यस्तरीय चॅम्पियनशिप मध्ये त्याने सहभागी होत आपले कौशल्य सिद्ध केले होते. मयुरेश याने अलीकडे सातारा येथे कुराश क्रीडा प्रकारात उतरला होता.तेथे त्याने जिद्दीने आपले कला कौशल्य दाखवित तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. सिंधुदूर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकिदो असोशिएशनचे संस्थापक व मार्गदर्शक सेन्सॉय वसंत जाधव तसेच प्रशिक्षक दिनेश जाधव यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. असोसिएशनच्या वतीने त्यानीं मयुरेशचे अभिनंदन केले.

मयुरेशने सावंतवाडीसह सिंधुदुर्गचा नावलौकिक मिळविला. तो मिलाग्रिस हायस्कूल ( सावंतवाडी ) चा विद्यार्थी असून अभ्यासात हुशार आहे. यावर्षी दहावीत त्याने 91.60 टक्के गुण मिळवत उज्वल यश मिळविले. त्याला दशावतार लोककलेचा प्रेमी आहे. हा दशावतारी बालकलाकार या कलेची आवड नाटकात भूमिका करून जपत आहे. काही नाटकात त्याने नारद व अन्य काही भूमिका साकारल्या आहेत. शालेय अभ्यासाबरोबर महाभारत – रामायण या पौराणिक कथांचा अभ्यास करीत आहे.

दशावतारी ज्येष्ठ व अनुभवी कलाकारांकडून तो या कलेतील बारकावे जाणून घेत आहे तसेच त्यांच्याकडून पुराण माहिती संकलन करीत आहे. दहावीनंतर त्याने यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकल ( चराठे – सावंतवाडी ) येथे सिव्हील इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यातील हवालदार मंगेश जाधव यांचा तो मुलगा होय.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.