68 th National Film Awards : अँड द नॅशनल अवॉर्ड गोज टू…

0
282

मुंबई : सिनेसृष्टीत महत्त्वाच्या आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलै २०२२ रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार असे..

१.सर्वोत्कृष्ट अभिनेता- अजय देवगन (तान्हाजी द अनसंग वॉरियर) आणि अभिनेता सूर्या (Suriya)
२. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-तुलसीदास जूनियर
३. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अपर्णा बालामुरली (Soorarai Pottru चित्रपटासाठी)
४. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – बिजू मेनन
५. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- मल्याळम दिग्दर्शक Sachidanandan KR (अय्यप्पनम कोशियुम)
६. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लक्ष्मी प्रिया चंद्रामौली (Lakshmi Priyaa Chandramouli) (शिवरंजिनीयम इनुम सिला पेंगलुम या चित्रपटासाठी)
७. सर्वोत्कृष्ट मेंशन ज्युरी अवॉर्ड – बालकलाकार वरुण बुद्धदेव
८. मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट – मध्य प्रदेश

९. स्पेशल मेंशन स्टेट – उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
१०. बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा अवॉर्ड – द लॉन्गेस्ट किस (The Longest Kiss)
११. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- सोरारई पोटारू
१२. सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फिल्म- द अनसंग वॉरियर
१३. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – Nanchamma
१४. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – राहुल देशपांडे (मी वसंतराव या चित्रपटासाठी)
१५.सर्वोत्कृष्ट गीतकार- मनोज मुंतशिर

यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुसस्कार जाहीर झालाय तर गोदाकाठ आणि अवांछित या दोन चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

नॉन फिचर्स फिल्म या विभागात कुंकूमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झालाय. तरसामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ची निवड करण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.