स्टार कपल कॅॅटरिना, विकिला जीवे मारण्याची धमकी

0
290

मुंबई :

बॉलिवूडचं स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती, अभिनेता विकी कौशलच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, या लोकप्रिय जोडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं सावधगिरी बाळगत या जोडीनं सांताक्रुझ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.

प्राथमिक माहितीच्या बळावर सध्या या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून, पोलीस धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेत असल्याचं कळत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.