कणकवलीचा सुपुत्र प्रणय राणेची प्रो कबड्डीच्या यु – मुंबा संघात निवड

0
248

कणकवली :

प्रो कबड्डीचे ९ वे पर्व पुढील महिन्यात सुरू होत आहे. या नव्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन. वाय. पी. कॅटेगरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा सुपुत्र प्रणय राणे याची निवड झाली आहे. ८.७८ लाख किमतीला यु मुंबा संघाने प्रणय राणे याची संघात निवड केली आहे. प्रणयची ही निवड कणकवली तालुक्याच्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.

प्रणय राणे हा कणकवलीच्या अभय राणे मित्रमंडळाच्या वतीने के पी एल मध्ये देखील आयकॉन खेळाडू म्हणून तो नावारूपास होता तसेच यंगस्टार संघाचा खेळाडू आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.