मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक सकाळी ७ च्या सुमारास संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं. गेल्या ६ तासांपासून राऊत यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.