महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत | उरणार फक्त भाजप | जेपी नड्डाचं मोठंं विधान

0
321

पाटणा :

संजय राऊतांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय घडमोडी ढवळून निघालेल्या असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं विधान केले आहे. भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा त्यांनी केला आहे. कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असेही नड्डा यांनी म्हटले आहे. बिहार येथील 16 जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.

नड्डा म्हणाले की, काँग्रेस आता देशातील अनेक राज्यांतूनही संपुष्टात येत असून, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. इथून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष हा एक कौटुंबिक पक्ष आहे, बिहारमध्ये आम्ही कौटुंबिक पक्ष असलेल्या राजदशी लढत आहोत. नवीन बाबूंचा पक्ष हा ओडिशातील वन मॅन पार्टी असून, महाराष्ट्रात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनाही एक कौटुंबिक पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा भाऊ-बहिणींचा पक्ष झाला असून, लढा बांधिलकीतून असतो, बांधिलकीतून ताकद जन्माला येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.