शिवसेना कोणाची ? | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज फैसला

0
276

नवी दिल्ली :

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे. तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली. आता आज शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.