मिशन ‘सावंतवाडी 12 तास रन’ | सिंधु रनर्स टीमचे 14 ऑगस्टला आयोजन

0
395

सावंतवाडी :

संपूर्ण देशात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असताना या महत्त्वपूर्ण अमृत महोत्सवानिमित्त सिंधु रनर्सने ‘सावंतवाडी १२ तास रन’ ही अभिनव संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अत्यंत विधायक पाऊल उचलले आहे. सावंतवाडी १२ तास रन या अभिनव उपक्रमाच्या आरंभासाठी सिंधु रनर्स टीमने कोकणातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम धावपटूंना या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी आवाहन केले आहे. सावंतवाडी १२ तास रन पर्व दुसरे या उपक्रमाचे जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी स्वागत केले आहे.

सहा – सहा तासांचे दोन सत्र आयोजित करून हा उपक्रम पार पडणार आहे. उपक्रमाला रविवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी येथील राजवाडापासून सुरुवात होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यात सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, कोकणसाद लाईव्ह व दैनिक कोकणसादचे मुख्य संपादक सादर चव्हाण, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, ज्ञानदीप शिक्षण संस्था सावंतवाडीचे अध्यक्ष जावेद शेख, सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो कराटे अकिदो असोसिएशनचे वसंत जाधव, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब पाटील आदींच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

सावंतवाडीसारख्या सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेल्या सुंदरवाडी या शहरात निसर्ग संपन्न वातावरणात जिल्ह्यातील नवोदित धावपटूंना स्वतःचे व्यासपीठ मिळवून देण्याचा सिंधू रनरचा हा प्रयत्न असणार आहे.
तरी जिल्ह्यातील व कोकणातील धावपटूंनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधु रनर टीमने केले आहे. सहभागासाठी व अधिक माहितीसाठी सिंधु रनरचे ओंकार पराडकर ९४२०३०७१८७, प्रसाद कोरगावकर ७७५६०९५०५१, डॉ. स्नेहल गोवेकर ९४२२३७३९२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंधु रनर्स टीमने केले आहे.

अशी होणार सावंतवाडी बारा तास रन
सावंतवाडी १२ तास रन या दुसऱ्या पर्वाची कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे-
१२ तास रन
६ तास रन सत्र १ :
सकाळी ५:३०
सर्व सहभागी धावपटू आणि निमंत्रित मान्यवर सावंतवाडी राजवाडा मुख्य दरवाजा जवळ जमतील.

सकाळी ६ :००
मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून आणि धावकांना पताका दाखवून रनला सुरवात होईल. सर्व धाविक सावंतवाडी मोती तलावाला एक फेरी पूर्ण करून गवळी तिठा, श्री देव उपरधकरकडून बुर्डीपूल मार्गे कोलगाव निरूखेवाडी रस्त्याला जातील. १२ तास / ६ तास रन करणारे धावक पूर्ण दिवस कोलगाव हायस्कूल ते बुर्डी पूल हे २.५ किलोमीटर अंतर लूपमध्ये पळतील.

६ तास रन / सत्र २ :

सकाळी ११:३०
सर्व सहभागी धावपटू आणि निमंत्रित मान्यवर सावंतवाडी राजवाडा मुख्य दरवाजा जवळ जमतील.

दुपारी १२:००
मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून आणि धावकांना पताका दाखवून रनला सुरवात होईल. सर्व धावक सावंतवाडी मोती तलावाला एक फेरी पूर्ण करून गवळी तिठा, श्री देव उपरलकरकडून बुर्डीपूल मार्गे कोलगाव निरूखेवाडी रस्त्याला जातील. ६ तास रन सत्र १ मधील धावपटू आपली ६ तास धाव दुपारी १२.०० वाजता पूर्ण करतील.

दुपारी १२.०० वा.
मान्यवरांच्या हस्ते सर्व धावकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. तसेच मान्यवरांना व धावकांना आपले मनोगत व्यक्त करता येईल.

सायंकाळी ५:००
६ तास आणि १२ तास रन करणारे धावक कोलगाव निरूखेवाडीवरून निघून बुर्डी पूल, श्री देव उपरलकर, गवळी तिठा मार्गे सावंतवाडी राजवाडा मुख्य दरवाजा पार करून आपली १२ तास किंवा ६ तास धाव सायंकाळी ६.०० वाजता पूर्ण करतील.

सायंकाळी ६:३० ते ७:००
मान्यवरांच्या हस्ते सर्व धावकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. तसेच मान्यवरांना व धावकांना आपले मनोगत व्यक्त करता येईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.