…तर ‘मातोश्री’चा वॉचमनही नोकरी सोडेल | थोड्या दिवसात पुरावेच देतो | निलेश राणेंचा ठाकरेंना इशारा

0
322

सिंधुदुर्ग : 

सध्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. त्यातच यात्रेवेळी उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून ठाकरेंना आणखीनचं कात्रीत पकडण्यात येतेय. त्यातच आता या निष्ठा यात्रेवर भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी निशाणा साधलाय. गर्दीचे पोलखोल करणार असल्याचा इशारा देतानाच ठाकरेंवर तिखट शब्दांत टीकाही केलीय.

काय म्हणाले निलेश राणे ?  

दोन चैनल सोडले तर पेंग्विनला कुत्रा विचारत नाही. इव्हेंट कंपनीला गर्दी जमवायचं टार्गेट दिलय, जर खरं चॅनल वाल्यांनी दाखवलं तर मातोश्रीचा वॉचमन पण नोकरी सोडेल. थोड्या दिवसात पुरावे सादर करतो.

आता या टीकेवर शिवसेनाकडून काय उत्तर हे पाहावं लागणार आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.