वीज जोडणी मंजूर होवून सुद्धा धनगरवाडी अंधारातच ; भाजप पदाधिकाऱ्यांचा वनअधिकाऱ्यांना घेराव

0
604

सावंतवाडी : चौकुळ धनगरवाडीस वीज जोडणी मंजूर होवून सुध्दा वाडी अजूनही अंधारात आहे. याला वनविभाग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचा पदाधिकाऱ्यांनी केलाय. माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराव घालण्यात आला. कामाला मंजूरी मिळुन सुद्धा रेंगाळलेल हे काम झालेच पाहीजे अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलाय. वीज जोडणीचे काम चालू असुन ९४ खांब उभे केलेत. मात्र १२ खांबासाठी हे काम थांबलय अस स्पष्टीकरण वीज अधिकारी महेश गोंधळेकर यांनी दिल. याप्रसंगी, तात्काळ कामाला सुरूवात करा, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष  महेश सारंग यांनी दिलाय. तर किरकोळ विषयासाठी चार वेळा यावे लागते, हे दुर्दैवच अशी खंत राजन तेली यांनी व्यक्त केली. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजन राऊळ, अजय सावंत आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.