राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात !

0
388

नवी दिल्ली : 

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई, बेरोजगारीविरोधात  काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आक्रमक पवित्राल घेतला आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांना काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.