‘सामना’च्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे

0
167

मुंबई : 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे हे पुन्हा बसले आहेत. यापूर्वी पत्नी रश्मी ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री होते त्यामुळे सामनाच्या संपादकपद पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिले होते. याआधी उद्धव ठाकरे हे ‘सामना’चे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते.

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. दरम्यान ते आता कोणत्याही संविधानीक पदावर नसल्याने पुन्हा सामनाच्या संपादक पदाची धुरा सांभाळणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.