सत्तांतरानंतर मुंबै बँकेचे अध्यक्षपद प्रवीण दरेकरांनी पुन्हा मिळवलं !

0
169

मुंबई : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या राजकीय खेळीमुळे गमावलेले मुंबै बँकेचे अध्यक्षपद भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे. राज्यातील सत्तातंरानंतर मुंबै बँकेतही सत्तापालट होणार, अशी चर्चा होती. मुंबै बँकेचे ध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. तर सिद्दार्थ कांबळे हे उपाध्यक्ष राहणार आहेत. यानिमित्ताने मुंबै बँकेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.