केसरकरांचे आरोप | नितेश राणेंनी घेतली फडणवीसांची भेट | चर्चांना उधाण

0
105

मुंबई : 

अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात युवा नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितले. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. मात्र या आरोपांनंतर नितेश राणे नाराज झाल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावर घालण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.