‘एक राखी सैनिकांसाठी’ | ओझर विद्यामंदिरचा स्तुत्य उपक्रम !

0
90

मालवण :

मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून भारतीय सैनिकांना पाठविण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे. ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे, अशा शूरवीर भारतीय सैनिकांबद्दल समाजामध्ये आदर निर्माण व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी म्हणून शाळेने यापूर्वीही हा उपक्रम अनेकदा राबविला आहे.

शाळेमार्फत सैन्याधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात भारतीय सैनिकांबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी खूप मेहनत घेतली. प्रशालेचे मुख्याध्यापक पी. आर. खोत यांच्या कुशल नेतृत्वामुळे असे उपक्रम राबविणे शक्य होते, असे प्रवीण पारकर यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.