मराठा लाईट इन्फट्री काली पाचवीचा स्थापना दिवस उत्साहात !

0
60

सावंतवाडी :

शहरातील हॉटेल मँगो येथे मराठा रेजिमेंट मधील व भारतीय सेनेतील 254 वर्षे जुनी बटालियन 2 मराठा लाईट इन्फट्री काली पाचवीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी युनिटचे सर्व माजी सैनिक व त्यांचे कुटुंब या वेळी उपस्थित होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली.  सूत्रसंचालन हवालदार दीपक राऊळ यांनी केले व युनिटच्या इतिहासबद्दल कॅप्टन कृष्णा परब यांनी सविस्तर माहिती सांगितली.

त्यानंतर 1965 आणि 1971च्या लढाईत प्रत्यक्ष भाग घेतलेले कॅप्टन मधुकर वारंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही प्रत्यक्ष लढाईचे वर्णन आपल्या भाषणात केले. या नंतर वीर नारींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सुभेदार रवींद्र पाताडे आणि कॅप्टन बाबु पडते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन लेफ्टनंट विनायक खोचरेकर यांनी केले.

या वेळी लेफ्टनंट अनिल धाऊस्कर, सुभेदार तुलसीदास गावडे, हवालदार सुर्यकांत पालव, हवालदार सिताराम राणे, अरुण गावडे, सुभेदार प्रमोद गवस, भरत गवस, गोविंद सावंत, सुभाष गावडे, प्रदीप सावंत, सत्यवान राऊळ, हवालदार बाबू लांबर आदी सहकुटुंब उपस्थित होते. दरम्यान, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ आणि ‘काली पाचवीचा विजय असो!’ या जयघोषात समारंभाची सांगता झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.