असलदेत प्राथ. शाळेतील 80 मुलांना मोफत रेनकोट वाटप !

0
87

कणकवली :

सावली जनसेवा शिक्षण संस्थेने जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत मदतीचा हात दिला आहे.अनेक प्राथमिक शाळांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २५०० हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप हे काम कौतुकास्पद आहे.असलदे गावातील माझ्या ८० मुलांना रेनकोट या संस्थेने वाटप केले, त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे कार्य सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याचे प्रतिपादन असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केले.

असलदे येथील प्राथमिक शाळा मधलीवाडी, तावडेवाडी, गावठणवाडी व नांदगाव असलदे शाळा न.४ येथे सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे या संस्थेमार्फत ८० मुलांना रेनकोट सरपंच पंढरी वायगणकर, चेअरमन भगवान लोके यांच्या पुढाकाराने वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुशांत दळवी, सरपंच पंढरी वायगणकर, चेअरमन भगवान लोके, संस्था सभासद सदस्य सदानंद चव्हाण, उपसरपंच संतोष परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, ग्रामपंचायत सदस्य दर्शना नरे, रघुनाथ लोके, महेश लोके, श्री.परब व मुख्याध्यापक सुरेखा सावंत,अर्चना राजपूत,मुख्याध्यापक शरद कदम, वृषाली मसुरकर, मुख्याध्यापक सौ. सामंत, सौ.कुडतडकर, मुख्याध्यापक शांताराम जंगले, नार्वेकर गुरुजी उपस्थित होते.

संस्थेचे कार्याध्यक्ष सुशांत दळवी म्हणाले, जे आम्हाला आमच्या काळात शिक्षण घेताना अडचणी अनुभवल्या त्या कुठे तरी या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. शैक्षणिक साहित्याच्या आमची संस्था हातभार लावत आहे. समाजात आम्ही काम करत आहोत.मुलांना हे रेनकोट दिल्यानंतर जो आनंद आहे, त्यात आम्ही समाधानी आहोत. भविष्यात ही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत काम करत राहील.

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे ही सामाजिक संस्था गेली ११ वर्ष सिंधुदुर्ग जिल्हयात सामाजिक, सांस्कृतीक, क्रिडा,  कृषीविषयक, आरोग्य विषयक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, उद्योजक निर्माण करणे. इत्यादी विषयामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून या वर्षी वरवडे, बिडवाडी, पिसेकामते , कळसुली या गावातील होतकरू गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले . तसेच कणकवली तालुक्यातील कळसुली , हुंबरठ , हळवल, वागदे, सातरल, कासरल, पियाळी, हरकुळ , माईण व मालवण तालुक्यातील पेंडुर , मालवण , कट्टा , असरोंडी व जिल्हयातील अन्य गावात गोरगरीब विद्यार्थ्यांना २००० रेनकोट वाटप करण्यात आले आहेत . तसेच कणकवली तालुक्यातील अपंग , दिव्यांग विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या वतीने कलमठ ग्रामपंचायत मध्ये १४ व्या विता आयोग मधून उपजिविका कार्यक्रमांतर्गत महिलांना साबण बनविणे , फिनॅल बनविणे , लिक्वीड साबण बनविणे इत्यादी व्यावसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे . संस्थेचे हे कार्य अविरतपणे सुरूच राहणार आहे . वरील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवण्या करिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद देसाई , मुंबई अध्यक्ष सचिन देसाई , सचिव उध्दव शिंदे , सदानंद चव्हाण , भुपेश चव्हाण , अभिषेक देसाई , प्रमोद घाडीगांवकर , विजय चिंदरकर , अजय घाडीगांवकर , महेंद्र सावंत आदी मेहनत घेत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.