कलंबिस्त हायस्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थीनींना मार्गदर्शन !

0
250

सावंतवाडी :

येथील रोटरी क्लब मार्फत कलंबिस्त हायस्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थीनींना आहार व मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. विनया बाड यांनी प्रशालेतील विद्यार्थीनींशी संवाद साधत त्यांच्या मनातील मासिक पाळी संदर्भातील विविध शंका, गैरसमज व भीती दूर करीत वैयक्तिक स्वच्छता, पूरक व योग्य आहार, व्यायाम व पाळी व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ‘अस्मिता’ योजनेअंतर्गत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रद्धा साळगावकर यांनीही यावेळी विद्यार्थीनींना मासिक पाळी संदर्भात सूचना देता अधिक मार्गदर्शन केले.

रोटरॅक्ट क्लबच्या वतीने उपस्थित अध्यक्ष मिहीर मठकर, रुचिता राठोड, जयराम राणे व त्यांचे सहकारी यांनी या क्लबचा उद्देश व कार्य स्पष्ट करीत वृक्षसंवर्धन या उपक्रमांतर्गत वृक्ष वितरीत करुन वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित रोटरी क्लब पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव व संस्थेचे सहसचिव चंद्रकांत राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत जाधव यांनी तर आभारप्रदर्शन विनीता कविटकर यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.