सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला..!

0
282

न्यूयॉर्क : जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये नुकताच हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना चाकूने वार करून जखमी करण्यात आले आहे.

लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. न्यूयॉर्कमधील बफेलोजवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्यात ते जखमी झाले आहेत. शुक्रवारी व्याख्यान देण्यापूर्वी कार्यक्रमाच्या मंचावर असताना रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.