शानदार सोहळ्यात ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या बिझनेस अॅपच लोकार्पण

0
621
सावंतवाडी : कोकणात डिजिटल मिडीयाच क्रांती पर्व सुरु करणाऱ्या ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’न आधुनिक तंत्रज्ञानात आणखी एक पुढच पाऊल टाकलंय. ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ घेवून येत आहे कोकणच पहिलं बिझनेस अॅप. या अॅपद्वारे आता माहिती बरोबरच जिल्ह्यातील उद्योग व्यापार क्षेत्राशी प्रत्येक सामान्य माणूस थेट जोडला जाणार आहे. या अॅपचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावणाऱ्या कर्तबगार व्यक्तीमत्वांचा सिंधुदुर्ग लाईव्ह च्या वतीन गौरवही करण्यात आला. डिजिटल मिडिया क्षेत्रात नवी क्रांती घडवणाऱ्या कोकणच महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह ने सर्वसामान्यांना उपयुक्त असलेले बिझनेस अॅप तयार केले आहे. या  अॅपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग लाईव्ह ने मिडिया क्षेत्रात पुढच पाऊल उचललं आहे. या  अॅपमुळे जिल्ह्यातील विविध व्यवसायिकांना सामान्य जनतेच्या संपर्कात राहता येणार आहे. हे  अॅप म्हणजे माहितीचा खजिना आहे. या  अॅपच्या माध्यमातून सामान्य जनतेला जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यालयांना आणि छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांशी संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे हे  अॅप इंटरनेट नसताना म्हणजेच ऑफलाईन ही चालू शकेल. या अॅपचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, प. पु. गावडे काकामहाराज  सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, कर्नल सुनील सिन्हा, विल्बर्ट प्रॉपर्टीचे विल्सन पिंटो, दिनेश कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात जिल्ह्याच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर आणि सन्माननिय पाहुण्यांनी आपल मनोगत व्यक्त केलं.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here