अब तांडव होगा! | मोहित कंबोज यांचं राष्ट्रवादीसाठी ‘बॅड मॉर्निंग’ ट्विट !

0
252

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आता आज त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलंय. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ईडी अॅक्टिव्ह आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचं उत्तर मोहित कंबोज यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिलंय. कंबोज यांचं हे ट्विट राष्ट्रवादीची धाकधूक वाढणारं आहे. त्यांच्या या ट्विटमधून राष्ट्रवादीला ‘बॅड मॉर्निंग’ म्हटल्याचं दिसतंय.

“माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.