पुंडलिक दळवींंच्या वाढदिनी काढलेल्या ‘कोकणसाद’च्या खास पुरवणीचं प्रकाशन…!

0
147

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस १८ ऑगस्ट रोजी होत आहे. यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित राहिल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित सुद्धा उपस्थित आहेत. तर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, रत्नागिरी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, पुजा दळवी आदी उपस्थित आहेत.

दरम्यान, यावेळी कोकणसादकडून दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढलेल्या पुरवणीचं प्रकाशन करण्यात आलं.

उद्या माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा देखील वाढदिवस असून आगामी नगरपरिषद निवडणूकीत भाजपकडून संजू परब तर राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी हे शहरातील प्रमुख चेहरे आहेत. दोघांनीही पक्षवाढीसाठी कंबर कसली असून राजकीय आखाड्यात एकमेकांना अंगावर घेणारे हे प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात संजू परब अन् पुंडलिक दळवी नेमकं काय बोलणार ? याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.