हीच माझी ताकद : पुंडलिक दळवी | वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, संजू परब यांची विशेष उपस्थिती

0
170

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस १८ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीयांकडून पुंडलिक दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, रत्नागिरी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दळवींना शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या उपस्थित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे, काका मांजरेकर यांसह सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान तालुका सरचिटणीस काशिनाथ दुभाषी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू, अफरोज राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख शहर चिटणीस राकेश निवगी रत्नागिरी जिल्हा महिला निरीक्षक सौ दर्शना बाबर देसाई राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, प्रा. सचिन पाटकर, आशिष कदम, आसिफ शेख, राकेश नेवगी, महिला शहर अध्यक्ष अँड. सायली दुभाषी तालुका सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, धोंडी दळवी, अर्षद बेग महिला तालुकाध्यक्ष सौ रिद्धी रोहन परब सौ पूजा दळवी उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साठेलकर तालुका सदस्य प्रकाश माडगूत आदी उपस्थित होते

माझे मित्र पुंडलिक दळवी, मार्गदर्शक प्रविण भोसले अशी सुरूवात माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाषणाला केली. यावेळी ते म्हणाले, राजकारणा पलिकडे आमचे मंत्रीपूर्ण संबंध आहेत. पुंडलिकवर संजू बोलला, अन् संजूवर पुंडलिक बोलला तरी त्याचा परिणाम मैत्रीवर होत नाही. आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर मी बसलो यातूनच आमच्यातील मैत्री लक्षात आली असेल. मात्र, नगरपालिकेत मित्र असलो तरी आम्हाला लढायच आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढू, असं विधान संजू परब यांनी केल.

कदाचित अर्चना घारेंचे प्रतिस्पर्धी असू….,संजू परब यांच सूचक विधान !

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित राहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी संजू परब नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले होते. याप्रसंगी बोलताना, संजू परब म्हणाले, अर्चना घारे-परब आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो. त्या इथं राष्ट्रवादी वाढवत आहेत. कदाचित भविष्यात आम्ही त्यांचेही प्रतिस्पर्धी असू शकतो असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींचा वाढदिवस भाजप माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला. याप्रसंगी बोलताना, संजू परब म्हणाले होते की, अर्चना घारे-परब आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो. त्या इथं राष्ट्रवादी वाढवत आहेत. कदाचित भविष्यात आम्ही त्यांचेही प्रतिस्पर्धी असू शकतो. यावर अर्चना घारे-परब यांनी भाष्य करण टाळलं असल तरी वाढदिवसाच्या ‘अॅडव्हान्स’ शुभेच्छा दिल्या. संजू परब यांचा उद्या १९ ऑगस्टला वाढदिवस होत असून घारे-परबांनी संजू परबांना दिलेल्या अँडवान्स शुभेच्छा विशेष ठरल्या. दरम्यान, पुंडलिक दळवी यांना शुभेच्छा देताना त्या भावूक झाल्या. राष्ट्रवादी पक्षाला सावंतवाडीत मिळालेली उभारी ह्यात सिंहांचा वाटा हा पुंडलिक दळवी यांचा आहे. त्यांनी ज्याप्रमाणे शुन्यातून विश्व निर्माण केले त्याला तोड नाही. आजही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. नात्यानं भावोजी असले तरी नेहमी भावासारखी सोबत त्यांनी आपल्याला दिली. यावेळी अर्चना घारे- परब भावूक झाल्या. तर भविष्यात पुंडलिक दळवी नक्कीच लोकप्रतिनिधींत्व करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजू परब, पुंडलिक दळवी हे एवढे चांगले मित्र आहेत याची कल्पना नव्हती.मात्र, संजू परब यांनी स्वच्छपणे मैत्रीपूर्ण लढू असं सांगितलं. आता तर त्यांचे बांधकाम मंत्री देखील आहेत. रविंद्र चव्हाण यांच्याकडून त्यांना उर्जा मिळेल, ही उर्जा त्यांनी जनतेसाठी वापरावी. आम्हाला देखील पवार साहेबांकडून उर्जा मिळते. आम्हीही ती जनतेसाठी वापरू, संजू परब यांच्या पाठीशी नारायण राणे, रविंद्र चव्हाण अशी मोठी ताकद आहे. पण, आमच्या मागे शरद पवार आहेत हे देखील लक्षात ठेवावं असं मत व्यक्त करत असताना प्रेमानं माणसं जपली जातात हे आज संजू परब यांच्या उपस्थितीतून जाणवलं, नाहीतर काहीजण प्रेम आहे, प्रेम आहे असं सांगत सुटतात अशी खोचक टीका प्रविण भोसले यांनी दीपक केसरकर यांच नाव न घेता केली आहे. तर संजू परब यांच्या देखील कौतुक करत पुंडलिक दळवींवर कौतुकाचा वर्षाव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात. यावेळी माजी राज्यमंत्री आदरणीय प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माझे मित्र भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे अशी सुरूवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली. माझे मित्र मला संपलेल्या पक्षात जावू नको, आपल्या पक्षात बोलवत होते. पण, संघर्षातून पुढे जाणं हा माझा पिंड आहे. त्यामुळे संजू परब राजकारणात बोलवत होते. पण, मि समाजकारणातच होतो.‌ दरम्यानच्या काळात अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून काम करताना कधी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला हे कळलं देखील नाही. संजू परब यांनी आज दाखवलेली उपस्थिती ही सावंतवाडीची संस्कृती आहे. मतभेद असतील पण मनभेद नसावे, हीच सावंतवाडीची संस्कृती आहे असं मत व्यक्त करत पुंडलिक दळवी यांनी त्यांचे मित्र, गुरु, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे ऋण व्यक्त करत हीच माझी ताकद आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.

कोकणसादच्या वाढदिवस विशेष पुरवणीच प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष पुरवणीच खास कौतुक होत आहे.

पुंडलिक दळवींसाठी संजू परब ‘राष्ट्रवादीच्या’ व्यासपीठावर !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस १८ ऑगस्ट रोजी झाला. यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी संजू परब यांच्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित सुद्धा उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, रत्नागिरी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, पुजा दळवी आदींच्या उपस्थित पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी बोलत असताना संजू परब यांनी त्यांच्यातील मैत्रीसह आगामी निवडणुकीवर देखील भाष्य केले.

दरम्यान, राजकीय पादात्राण बाजूला सारून राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविलेल्या संजू परब यांच कौतुक करत असताना राजकारणात प्रवेश करण्याची ऑफर संजू परब यांनी दिली होती असं विधान केलं. पुंडलिक दळवी अन् संजू परब यांचे वाढदिवस लागोपाठ आहेत. दोघांमधील राजकिय हाडवैर सर्वक्षृत आहे. त्यात पक्ष वाढीसह नगरपरिषदेत सत्ता प्राप्त करण्याचा दोघांचही स्वप्न असून पुंडलिक दळवींना शुभेच्छा देण्यासाठी संजू परब राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेल्यानं शहरात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.