श्रीवर्धनमध्ये बोटीत एके-47 | जिल्ह्यात हायअलर्ट

0
222

रायगड : रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये . या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे.

दरम्यान, वेंगुर्ला पोलीस ठाणे परिसरातील सर्व सागर रक्षक दल , वार्डन, मच्छीमार बांधव, सर्व् पोलीस पाटील, व सागरी किनारी राहणारे नागरिक यांना वेंगुर्ला पोलीस ठाणे तर्फ सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. काही माहिती मिळाल्यास किंवा कोणी संशयस्पद इसम – नागरिक, बोट आढळल्यास तात्काळ वेंगुर्ला पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं. हेल्प लाईन् 1093 मो. नंबर 02366263433 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.