निवडणूकांसाठी कामाला लागा, मी तुमच्या पाठीशी : मंत्री रविंद्र चव्हाण

0
389

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, माजी पाणीपुरवठा सभापती उदय नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विकासकाम, निवडणूका, संघटनात्मक बांधणीसह विविध विषयांवर चर्चा केली. तर पदाधिकाऱ्यांकडून देखील मांडण्यात आलेल प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचा शब्द मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिला.

यावेळी मंत्री चव्हाण यांनी तालुक्यासह सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजप नेते महेश सारंग, माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक, सुधिर सुधिर आडिवरेकर, उदय नाईक यांच्याशी चर्चा केली. शहरातील प्रकल्पांसह रखडलेल्या विकासकांमांबाबत माजी नगरसेवकांकडून माहिती घेतली. पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकांत भाजपला स्वबळावर लढायच आहे. शतप्रतिशत भाजपसाठी सगळ्या निवडणूका जिंकायचा आहेत. त्याकरीता ताकदीने मेहनत घ्या, लागेल ती मदत करू, मी तुमच्या पाठीशी आहे असा शब्द रविंद्र चव्हाण यांनी दिला. याप्रसंगी जिल्ह्यातील विकासकांवर देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई-गोवा हायवे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठीच नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई अन् कोकण प्रवास गतीमान होणार आहे. आडाळी एमआयडीसीत उद्योगासह कंपन्या आणून स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार संधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिला.

दरम्यान, भाजपकडून जिल्ह्यात करण्यात आलेल्या ९१६ बुथ रचनेबाबत मंत्री महोदयांना महेश सारंग यांनी माहिती दिली. यावेळी शक्तिकेंद्रप्रमुख,‌ बुथप्रमुखांची एकत्रित बैठक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या महिन्याभरात घेत संघटनात्मक बैठक होणार असून मंत्री रविंद्र चव्हाण यावेळी मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती महेश सारंग यांनी दिली.

तर दुग्ध व्यवसायिक, कुक्कुटपालन व्यवसायिक आदींना सक्षम करण्यासाठी शासन अन् जिल्हा बँक यांच्या माध्यमातून मदत केली जाईल. भात खरेदी-विक्री केंद्रातून साडे सहा कोटी बोनस शेतकऱ्यांना येण आहे. हा बोनस येत्या काही दिवसांत जमा होईल असं आश्वासीत केल्याची माहिती जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.