सावंतवाडी येथे माजी आमदार शंकर कांबळी यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन

0
635
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने जिमखाना मैदान स्पोर्ट्स कॉमप्लेस येथील जीमचे नुतनीकरण करण्यात आले या नूतनीकरणानंतर या जिमचे उद्घाटन शनिवारी माजी आमदार शंकर कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले.सावंतवाडी नगरपालिकेकडून शहरातील व्यायाम पटूंना नीट व्यायाम करता यावा यासाठी जिमखाना स्पोर्ट्स कॉमप्लेक्स येथील जीमचे नूतनीकरण केले आहे .या जीमच्या नूतनीकरणामुळे आणि आतील आधुनिक यंत्रसामग्रीमुळे  येथील व्यायम पटूंना तसेच जे तरुण व्यायाम करू इच्छित आहे त्यांच्यासाठी ही पर्वणी ठरणार आहे. शंकर कांबळी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करून ही जिम खुली करून देण्यात आली आहे. या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, मोतीराम नेवगी, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here