Action on illegal liquor | गोवा बनावटीची 55 लाखाची दारू जप्त

0
395

कणकवली : कणकवली-ओसरगाव येथे आयशर कंटेनर टेम्पोमध्ये विदेशी दारूचे 450 बॉक्स, बिअर बॉक्स 63 असे एकूण बॉक्स 513 मिळून 55 लाख 1हजार 480 रुपयाचा मुद्देमाल कणकवली एक्साईज विभागाने जप्त केला.

एक्साईज विभाग महामार्गावर गस्त घालताना हा कंटेनर त्यांना आढळून आला. यावेळी संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी कंटेनर उघडला तर आत अवैध दारू पोलिसांना आढळली.  ही दारू 55 लाखाची असून दारू वाहतूक करणारा कंटेनर देखील जप्त करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.