CRICKET | M S धोनी कसे बनला पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण..!

0
2229

ब्युरो न्यूज : Asia Cup 2022 स्पर्धेच्या 15 व्या अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ विजयी झाला. संघाच्या विजयानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने एक मोठे विधान केले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. तसेच, पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभवदेखील केला होता.

आशिया चषक 2022 मध्ये नाणेफेकीने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर एकही नाणेफेक गमावली नाही. शनाकाच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व सामने जिंकले. युएईच्या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे खूप सोपे असते. आकडेवारीही याची साक्ष देते.

मात्र, फायनलमध्ये नशिबाने श्रीलंकेला साथ दिली नाही आणि शनाकाने नाणेफेक गमावली. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली, पण संघाने हा सामना जिंकला. सामन्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने सांगितले की, IPL 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदामुळे आम्हाला सामना जिंकण्यासाठी मदत झाली.

अंतिम सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने एक खुलाासा केला. त्याने सांगितले की, “2021 मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला होता. तेव्हा अशा स्थितीत आमचा संघही लक्ष्याचा बचाव करताना विजय मिळवू शकतो, असा विश्वास सर्व खेळाडूंना होता. त्यामुळे संघाला हा सामना जिंकता आला”.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.