‘वेदांता’वरून टीका करणाऱ्यांनी 3 लाख कोटींच्या रिफायनरीचं समर्थन करावं : मंत्री केसरकर

0
318

सावंतवाडी : वेदांता राज्याबाहेर गेली म्हणून आभाळ कोसळल्यासारखी भुमिका घेणाऱ्या विरोधकांनी रत्नागिरी रिफायनरीच्या ३ लाख कोटीच्या प्रकल्पाचे समर्थन करावं. हा प्रकल्प झाल्यास दिड लाखाहून अधिक नोकर्‍या या ठिकाणी मिळणार आहे. पर्यावरणाच्या नावावर कोणी आपली राजकीय पोळी भाजू नये. कोकण आमचं आहे ते हिरवगार आम्हीच राखल आहे. त्यामुळे त्याला बाधा येणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज रिफायनरी विरोधकांना ठणकावलं.

मंत्री केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांची भूमीपूजन करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजप – शिंदे गटाचे माजी नगरसेवक उपस्थित होते. न्यू सबनीसवाडा इथ ओम गणेश सोसायटी गार्डन ओपन जिम, खेळणी बसविणे, जिमखाना लाखे वस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण व गटार बांधकाम कामाचा शुभारंभ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, बॅडमिंटन कोर्टच्या विकासकामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला, शहरातील मोती तलावामधील निरीक्षण कट्ट्यावर केशवसुत कट्टा बैठक व्यवस्था व पेव्हर ब्लॉक बसविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर लगतच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक आदी विकासकामांची भूमीपूजने पार पडली.

न्यू सबनीसवाडा इथ ओम गणेश सोसायटी गार्डन ओपन जिम, खेळणी बसविण्यासाठी येथील माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी आपल्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. या कामाचा शुभारंभ मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर लाखे वस्तीतील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण, गटार बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यासह पिण्याच्या पाण्यासाठी विहीर उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी लाखे वस्तीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरच सोडविल्या जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर मोती तलाव काठी सुरू करण्यात येणाऱ्या खाऊ गल्लीसह बोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. विशेषतः महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तर सर्वात मोठा प्रकल्प संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी निधी उपलब्ध होणार असून या ठिकाणी सुसज्ज इमारत उभी राहणार आहे अशी माहिती केसरकर यांनी दिली.

दरम्यान, वेंदाता राज्याबाहेर गेली म्हणून आभाळ कोसळल्यासारखी भुमिका घेणाऱ्या विरोधकांनी रत्नागिरी रिफायनरीच्या ३ लाख कोटीच्या प्रकल्पाचे समर्थन करावं, हा प्रकल्प झाल्यास दिड लाखाहून अधिक नोकर्‍या या ठिकाणी मिळणार आहे. रत्नागिरी येथे होणारा प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा आहे. त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचे समर्थन कराव, पर्यावरणाच्या नावावर कोणी आपली राजकीय पोळी भाजू नये. कोकण आमचं आहे ते हिरवगार आम्हीच राखल आहे. त्यामुळे त्याला बाधा येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अस मत व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक अनारोजिन लोबो, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, बाबू कुडतरकर, राजू बेग, उदय नाईक, शुभांगी सुकी, भारती मोरे, दिपाली भालेकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, अमेय तेंडोलकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नंदू शिरोडकर, निता कविटकर, दत्ता सावंत‌ यांसह नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी भाजप व शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.