Oil ship sinking case | किनाऱ्यावर दिसणाऱ्या त्या गोळ्यांचा बुडालेल्या जहाजाशी संबंध नाही : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण

0
184

देवगड : विजयदुर्ग येथे 40 वाव खोल समुद्रात टेलवाहू जहाज बुडाल्याने विजयदुर्ग ते मालवण समुद्र किनारी प्रदूषण होण्याची शक्यता असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली होती. त्यानंतर किनारपट्टी भागात डांबर सदृश्य गोळे दिसत असल्याने प्रशासनाच्या वतीने किनारपट्टी भागातील मच्छिमार बांधवांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. रविवारी देवगड तालुक्यातील देवगड शहर, मिठमुंबरी, मुणगे, कुणकेश्वर, तांबळडेग या किनाऱ्यावर डांबर सदृश्य ऑइलच्या गोळे मोठ्या प्रमाणात दिसून आले होते. याची पाहणी करण्यासाठी रविवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री लाटे हे देवगड येथे आले होते. त्यांनी या ऑईलच्या गोळ्यांचा नमुने तपासणी साठी घेतले असून विजयदुर्ग येथे बुडालेल्या जहाजाचा व ऑईल गोळ्यांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  त्यासंदर्भात पत्र जिल्हाधिकारी व देवगड प्रभारी तहसीलदार यांना दिले आहे.

या पहाणी दरम्यान प्रभारी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, देवगडचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी श्री मालवणकर उपस्थित होते .

सदरचा काळा पदार्थ हा डांबर नसुन ऑईल सदृश्य असल्याचे प्रदुषण अधिकारी यांचे मत आहे. अशा पदार्थ अधुनमुधुन समुद्र किनारी येत असतात असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. सदर काळे पदार्थ वरील पार्थ जहाज अपघातग्रस्थ झाल्याने वाहून आलेले आहेत, असा निष्कर्ष आज रोजी काढता येणार नाही, असे आमचे सर्वांचे मत आहे, असे प्रभारी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.