‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’चा आयपीओ शेअरबाजारात | तीन नवीन ऍडमिशन सेंटर सिंधुदुर्गात होणार

0
185

भरत केसरकर 

सिंधुदुर्ग : तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’चा आयपीओ शेअरबाजारात दाखल झाला असून गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. ‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’चा आयपीओ नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये १६ सप्टेंबर २०२२ रोजी खुला झाला. येत्या २० सप्टेंबरपर्यंत तो खुला असेल. या कंपनीकडून १० रुपये फेस व्हॅल्यूचे (दर्शनी मूल्य) ३० लाख शेअर १२२ रुपये प्रतिशेअर (समभाग) किमतीने जारी करण्यात आले आहेत. यातून कंपनी ३६.६० कोटी रुपये जमविणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये ५० टक्के शेअर एनआयआय कॅटेगिरी आणि ५० टक्के रिटेल कॅटेगिरीमध्ये आरक्षित आहेत.

मुख्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’ कंपनी ३ नवीन ”ऍडमिशन” सेंटर सुरु करणार आहे. याद्वारे कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन विकास झाल्याने नवे आधुनिक तंत्रज्ञान उत्पादनाची आवश्यकता असल्याचे समोर येत आहे. जी कंपनी या गरजांची पूर्तता करते तिला केवळ फक्त मोठे आर्थिक उत्पन्न मिळतेच पण दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत चांगला नफा मिळतो. मुंबईस्थित असलेल्या तंत्रज्ञान कंपनी ‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’ने सुद्धा आपल्या ३ प्रमुख ऑफरिंग ”ऍडमिशन”, ”हायड्रा” आणि ”जम्प टॉक” यांच्या माध्यमातून ग्राहकांना नव्या क्षेत्रात संधीची एक संधी दिली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील एक नवा प्लॅटफॉर्म असलेली ”ऍडमिशन” शैक्षणिक क्षेत्रात नवीन उत्क्रांती घडवत आहे. जे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ शिक्षकांच्या माध्यमातून जोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शिक्षक, विषय आणि शैली याला जोडण्यासाठी आश्वासित करणार आहे. जागतिक स्तरावरील भौतिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या डिजिटल माध्यमातून सुसज्ज अशा वर्गांना शैक्षणिक प्लॅटफॉर्म लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम असेल.

शैक्षणिक क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र जोडून यासाठी हा उद्देश असून त्यातील हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. ” ऍडमिशन”कडून संपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी १० लाख विद्यार्थी आणि २ हजार शिक्षकांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच उत्कृष्ट व्हाईट बोर्ड, त्याचे सादरीकरण आणि वितरित करण्यात आलेली डिजिटल साधने उपलब्ध असतील. नव्या तंत्रज्ञानाद्वारे कमीत कमी बँड विथचा वापर करण्यासाठी निर्मिती होऊ शकते.

या व्यतिरिक्त डिजिटल वर्ग चालवण्यासाठी कंपनीकडून सर्व नेटवर्क कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. कंपनीचे पहिले शैक्षणिक केंद्र कंपनीचे मिशन असलेल्या १ कोटीची फिजिकल इकोसिस्टम स्थापन करण्याच्या उद्देशाने आहे. कंपनीचे पहिले केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु झाले आहे. हे केंद्र सिंधुदुर्गवासियांसाठी अत्याधुनिक शिक्षण सुविधा तसेच गुणवत्तायुक्त शिक्षक प्रदान करणार आहे. कंपनीचे शिक्षक ऑनलाइन आणि ऑफलाइन पाठ्य उपक्रम प्रदान करणार आहे. ज्यामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून विकास करण्यात येईल.

तसेच ”हायड्रा हे वेब सोल्युशन असून छोट्या संस्थांचा आर्थिक विकास रोजगार तसेच शिक्षणासाठी हायस्पीड इंटरनेट सेवा देते. जे या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. हायड्रा वेबने शहरी भागासमवेत ग्रामीण भागातही एक विश्वसनीय स्थान निर्माण करताना कॉम्प्युटर क्षेत्रात डेटा सेंटर बनविले आहे. तसे पाहिल्यास ‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’ कंपनीचे हे तिन्ही ‘ऑफरिंग” महत्त्वाचे असून मोठी आर्थिक उलाढाल तसेच नफा मिळवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. तर ”जम्प टॉक” एक वेब आधारित व्हिडिओ कॉन्फरन्स टूल असून हे उपयोग करणाऱ्यांसाठी ऑडिओ किंवा ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन कनेक्ट करण्यासाठी उपयोगी पडते.

‘वरेन्यम क्लाऊड लिमिटेड’ ही आयटी कन्सलटिंग आणि सॉफ्टवेअर कंपनी असून शेअरबाजारात (एनएसई आणि बीएसई) लिस्टेड आहे. कंपनीकडून प्रत्येक तिमाहीला निकाल आणि बोर्ड मिटिंग (सर्वसाधारण सभा) होते. कंपनीचे मुख्य कार्यालय Third Floor, Plot No. 244-A RDP 2, CTS 1374/B Vill, Versova SVP Nagar, Four Bungalows, Mumbai- 400053 येथे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.