शिंदे सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री | सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार?

0
497

मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात दीर्घकालीन संपामुळे अगोदरच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळापुढे पुन्हा नवी समस्या उभी राहिली आहे. आगामी महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाल पाने पुसली जाणार का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होतो तेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी पुढील चार वर्षे ३६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. परंतु, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.