राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित…!

0
57

मुंबई : काँग्रेस पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, हे आता जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असा ठराव देभरातील सात राज्यांमधील काँग्रेस पक्षाने मंजूर केला आहे. आज मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत देखील राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे असा ठराव करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह एकूण ७ राज्यांमधील प्रदेश काँग्रसेने राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत असून राहुल गांधी हेच अध्यक्ष होतील हे निश्चित मानले जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.