सहकारातील सर्वोच्च सन्मान | ‘कॅथॉलिक अर्बन’ला राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ २०२२’ पुरस्कार

0
115

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२२” या पुरस्काराचा मान कॅथॉलिक अर्बन को-ऑप. कॅडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपुर्ण कोकण विभागातून १०० कोटी ठेवीवरील सिंधुदुर्ग जिल्हयातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे.

संस्थेने आजपर्यंत व्यवसायाची बांधिलकी राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनकडून पतसंस्थांच्या आर्थिक व एकत्र व्यवस्थापनाच्या कामकाजाचा वेगवेगळ्या सहकार महर्षी व दिग्गजांकडून मुल्यांकन व पडताळणी करून त्याआधारे हा पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीमध्ये दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल गणपतीपुळे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या राज्यव्यापी कार्यक्रमात अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला.

आज संस्थेने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या नेट बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत व सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. हा पुरस्कार म्हणजेच संस्था करीत असलेल्या चांगल्या कामगिरीची पोच पावती होय. ग्राहकांचे संस्थेवरील प्रेम व विश्वासामुळे संस्था सतत प्रगतीपथावर राहिली आहे. अशा या संस्थेचे सर्व सभासद, ग्राहक, संचालक, कर्मचारी वृंद व पिग्मी प्रतिनिधी यांचे मनपूर्वक आभार संस्थेनं मानले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.