किरीट सोमय्या पुन्हा एकदा दापोली दौऱ्यावर…!

0
131

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या उद्या गुरुवारी पुन्हा एकदा दापोली दौऱ्यावर जाणार आहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील काय कारवाई केली आहे. यासंबंधीची विचारणा करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल होणार आहेत.

शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट असून त्याच्या बांधकामात अनियमितता असल्याचा आरोप परबांवर आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाडापाडीची निविदाही काही दिवसांपूर्वी काढण्यात आली होती.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.