राष्ट्रीय पोषण माह निमित्त हळबे महाविद्यालयात व्याख्यान व पोस्टर प्रदर्शन

0
51

दोडामार्ग : मुलांच्या निकोप वाढीसाठी उत्तम आहार असणे आवश्यक आहे. यासाठी शासन पातळीवर विविध उपक्रम राबविले जातात. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी, त्यांचे पोषण व्यवस्थित व्हावे म्हणून शासनामार्फत पोषण माह उपक्रम सुरु आहे. या अंतर्गत येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एस. बी. आयनोडकर आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती दोडामार्ग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आरोग्य सेवक अमोल गवस, आरोग्य सहाय्यक श्री गोसावी, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप बर्वे, डॉ, राजेंद्र इंगळे उपस्थित होते.

पोषण आहाराचे महत्त्व विशद करणाऱ्या पोस्टर प्रदर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख व्याख्याते श्री आयनोडकर यांनी आपल्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या, रानभाज्या आयोडीन युक्त मिठाचा वापर कसा आणि कधी करावा याविषयी उपयुक्त माहिती दिली, विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे समर्पकपणे त्यांनी निरसन केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून  प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी उत्तम आरोग्य असण्याचे फायदे आणि हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपाय विशद केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. राजेंद्र इंगळे यांनी कार्यक्रमाचा  उद्देश सांगितला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयान कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. महिमा गवस हिने तर आभार प्रा. दिलीप बर्वे यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.