वैभववाडी शहरातील सार्वजनिक भुखंडावर अनाधिकृतपणे बांधकाम | मुख्याधिकाऱ्यांकडुन नोटीस

0
206

वैभववाडी : शहरातील सार्वजनिक भुखंडावर सरक्षंक कठड्याचे काम करण्यात आले आहे.अनाधिकृतपणे सुरू असलेल्या या बांधकामावरून ऐन दुर्गाउत्सवात वैभववाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपंचायत अँक्शन मोडमध्ये आली आहे. संबंधित बांधकाम थांबवावे अशी नोटीस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी बांधकाम केलेल्या भिंतीलाच चिकटविली आहे.

शहरातील वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यालयानजीकच सरकारी भुखंड आहे.यावर तालुक्यातील विविध संस्था,राजकीय पक्षाचे कार्यक्रम,सांस्कृतीक महोत्सव याच ठिकाणी होतात.भुमापन क्रमांक ३८/८ या भुखंडावर यापुर्वी स्टॉलरूपी अतिक्रमण झालेले आहे.दरम्यान या भुखंडावर लावण्यात आलेल्या स्टॉलपैकी दोन स्टॉल हटविण्यावरून गेले दोन तीन वैभववाडीतील वातावरण ढवळुन निघाले आहे.या भुखंडामध्ये सरक्षंक कटडा बांधण्याचे काम सुरू आहे.हे बांधकाम नेमक कोण करतेय याची माहीती नगरपंचायतीला नाही.यासंदर्भात उलटसुलट प्रतिक्रिया आल्यानंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी आज या भुखंडावर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे आणि केलेले बांधकाम २४ तासांच्या आत निष्कासीत करावे अन्यथा नगरपंचायतीमार्फत हे बांधकाम हटविण्यात येईल.बांधकाम हटविण्याचा सर्व खर्च आपल्याकडुन वसुल करण्यात येईल अशी नोटीस दिली आहे.याशिवाय अतिक्रमण हटाव कारवाईच्या वेळी होण्याऱ्या आर्थीक नुकसानीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे देखील नोटीसीत नमुद केले आहे.

दरम्यान, या नोटीसीमुळे खळबळ माजली आहे.वैभववाडीतील काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली होती.त्यानतंर त्यांनी ही नोटीस काढली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.याच भुखंडावर दुर्गादेवीची स्थापना केली जाते.त्यामुळे ऐन दुर्गात्सोवाच्या दोन तीन दिवस अगोदर भुखंडावरील अतिक्रमणाचा वाद चव्हाट्यावर आल्यामुळे तो अधिक चिघळण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सव पुर्वी हे बांधकाम हटविले जाणार की नाही याची चर्चा आता सुरू आहे. तसेच यामुळे शहरातील अवैध स्टाँलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर प्रशासन आता कठोर भुमिका घेणार आहे का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

शहरातील या विषयासंबंधी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील भुपान क्रमांक ३८/८ हा सरकारी भुखंड आहे. या भुखंडावर अनाधिकृत पणे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. ते हटविण्याबातची नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय संबधितांनी बांधकाम हटविले नाही तर ते बांधकाम नगरपंचायतीमार्फत हटविण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.