खारेपाटणच्या पॉवर हाऊसला आग | ‘हे’ तालुके अंधारात ?

0
689

कणकवली : खारेपाटण विद्युत पारेषणच्या सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे वैभववाडी देवगड व मालवण तालुक्यातील विजयपुरवठा खंडित झाला आहे. सदरचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे. कणकवली मधील विद्युत पुरवठा तात्पुरता राधानगरी येथून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे देवगड आणि मालवण तालुके सध्या अंधारात असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.

गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास या ट्रांसफार्मरला लागलेली आग कणकवली नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाने विझवण्यात आली. मात्र यामुळे खंडित झालेल्या वीजपुरवठ्यापैकी कणकवली तालुक्यातील विजापुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील विजयपुरवठा खंडित आहे. हा विजपुरवठा तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने महावितरण व महापारेषण चे कर्मचारी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा सुरू होईल यादृष्टीने सर्व प्रयत्न सुरू असल्याचे श्री मोहिते यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.