सुदैवानं टळला अनर्थ, शॉर्टसर्किटनं लागली आग

0
396

सावंतवाडी : उभाबाजार येथील सुवर्णकार सामाजिक कार्यकर्ते बाळ चोणकर यांच्या दुकानास शॉर्टसर्किटनं आग लागली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण ठेवण्यात यश आले. महावितरणच्या वायरमननी वेळीच धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. यामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. वेळीच आगीवर नियंत्रण प्राप्त करता आल्याने मोठी दुर्घटना टळली. आजूबाजूला राहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, यात दुकानाच मोठ नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटच नेमकं कारण समजू शकले नसून नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.