वीज कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे विद्युत पुरवठा सुरळीत…!

0
125

कणकवली : वीज कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे शुक्रवारी सकाळी मालवण व देवगड भागातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला. कणकवली. खारेपाटण येथील महापारेषणच्या सबस्टेशन मधील ट्रांसफार्मरला आग लागल्यानंतर वैभववाडी, मालवण व देवगड तालुक्यातील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी महापारेषण व वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.

त्यानंतर रात्री सुरुवातीला कणकवली तालुक्यातील काही भाग व वैभववाडी तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. रात्री 11 वा. मालवण तालुक्यातील काही भागातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. तरीदेखील देवगड सह अन्य काही भागातील सुमारे 40 हजार वीज कनेक्शन बंद होती.

यामुळे या वीज ग्राहकांना अंधारातच रात्र काढावी लागली. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता याकरिता अहोरात्र काम सुरू ठेवत तब्बल 15 तासाने सकाळी 7 वाजता या 40 हजार वीज कनेक्शनचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. यासाठी महापारेषण चे अधीक्षक अभियंता प्रांजल कांबळे, कार्यकारी अभियंता विजय निकम, अभिजीत ढमाले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाथरे व कवलीकट्टी, उपअभियंता तिवारी, साहू, माने, नाटेकर, डमकारे यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या आगीत महापारेषणचे मोठे नुकसान झाले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.