अॅॅरोंज’च्या सहकाऱ्यांना पोलिसांनी केलं जेरबंद

0
558
सिंधुदुर्गनगरी : जनतेची फसवणूक करणारी अँरोज डायनॅमीक इंटरप्राईजेस मुंबई भांडुप येथिल कंपनीच्या सहकाऱ्यांना आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले. काही महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेअर मार्केटिंगचे प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने उघड करून संशयितांना जेरबंद केले होते. त्याच पार्श्वभूमीवर कुडाळ नेरूर येथील कृष्णा सदाशिव मदने यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक मुंबईला रवाना होऊन संशयित आरोपी अर्जुन गजानन सावंत, वैदही अर्जुन सावंत, शिवदत्त आत्माराम सावंत या तीन संशयिताना ४६ लाख ८८ हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. अँरोज डायनामिक एंटरप्राइजेस भांडुप या नावाने कंपनी काढून महिना तीन ते चार टक्के गुंतवणूक केलेल्या रकमेवर व जादा रकमेचे व्याजाच्या आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर चेकद्वारे व रोख स्वरूपात रकमा स्वीकारून त्यांची फसवणूक करत.  दोन संगणक एक लॅपटॉप तसेच बँकांचे चेक व अँरोज डायनामिक इंटरप्राईजेस भांडुप मुंबई या नावाचे कंपनीचे शिक्के जप्त करण्यात आलेले आहेत तसेच. या संशयित आरोपींचे बँक खाते सील करण्यात आलेली आहेत सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम व अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपाधीक्षक एन टि मोरे, के. व्ही .चव्हाण महिला पोलीस डी. डी. सावंत, एम .ऐ .राठोड, चालक अभिजित दुधाने तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here