शिवस्मारक उभारा मालवण किल्यावर ; आमदार नितेश राणेंनी केलं ट्विट ; वेधलं सरकारचं लक्ष

0
856

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात उभारण्यात येणारे शिवस्मारक मालवणातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे करणार आहे असे ट्विट सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला गालबोट लागल्यानंतर राजभवन परिसरात शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे. परंतु कोकणचे आमदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या मालवण किल्ल्यावर स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान आगामी काळात होणाऱ्या अधिवेशनात ही मागणी आपण लावून धरणार आहे,असेही त्यांचे म्हणणे आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.