त्या वैदयकिय अधिकारी यांच्यावर कारवाईची सभागृहाची मागणी

0
506
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी,उपाध्यक्ष रणजित देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ एच.टी.जगताप ,विषय समिती सभापती प्रितेश राऊळ,संतोष साटविलकर,सायली सावंत,शारदा कांबळे,समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,सदस्य सतीश सावंत,नागेंद्र परब,प्रदीप नारकर, अमरसेन सावंत, सरोज परब,संजय पडते,महेंद्र चव्हाण,अधिकारी,खातेप्रमुख उपस्थित होते.त्या शिक्षकाना बडतर्फच,जिल्ह्यातील पाच शिक्षकांनी गैरवर्तन केल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे मात्र त्यांना बड़तर्फ करण्याची तरतूद नाही.असे शिक्षणाधिकारी यांनी सभागृहात सांगितले.यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा शिक्षकांना बडतर्फच करायला पाहिजे या मताचे आपण आहोत असे स्पष्ट केले.यासाठीची चौकशी समिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी समाविष्ट करुन ती चौकशी जिल्ह्यात होईल यासाठी अपन प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या.त्या महिलेला मदत केलीच पाहिजे,कास मडुरा येथील महिलेचे कुटुंब नियोजन शास्त्रकिया करताना डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाल्याने मोठे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या डॉक्टरला चौकशी समितित क्लीन चिट दिली आहे.त्या डॉक्टरला शिक्षा व्हयलाच पाहिजे अशी मागणी दादा कुबल यांनी केली.याला सभागृहाने मान्यता दिली व तीला याबाबत न्याय मिळण्यासाठी, न्यायालयीन लढा लढ़न्यासाठी सर्व ती मदत करण्याचे सभागृहाने मंजूर केले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.