मालवण तालुका सरपंच-उपसरपंच सेनेची स्थापना ; तालुकाप्रमुख नंदू गावडे तर उपतालुकप्रमुख संदेश तळगावकर 

0
887
मालवण – मालवण तालुका सरपंच-उपसरपंच सेनेची स्थापना गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात तालुकाप्रमुखपदी हेदुळ सरपंच नंदू गावडे  तर उपतालुकाप्रमुख वायरी भूतनाथ उपसरपंच संदेश तळगावकर यांची निवड करण्यात आली.दरम्यान जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी किर्लोस सरपंच प्रदीप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच तालुक्याची उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ प्रवीण सावंत यांनी दिली. मालवण शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या सरपंच व उपरपंच यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर, गणेश कुडाळकर, किरण वाळके, शहर प्रमुख बाबी जोगी, संमेश परब, डॉ प्रवीण सावंत व सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीत सरपंच तसेच काही ठिकाणी उपसरपंच हे शिवसेनेचे आहेत. यापूर्वी केवळ नांदोस ग्रामपंचायत शिवसेनेकडे होती. आता तालुका भगवा होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मालवण तालुक्यातूनच शिवसेनेला सर्वाधिक मताधिक्य असेल असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.